पहिल्याच आंदोलनासाठी तरुणींचा उत्साह

पहिल्याच आंदोलनासाठी तरुणींचा उत्साह
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुख्य निवडणूक आयुक्यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कमधील कोक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ‘जेन झी’चा सहभागी लक्षणीय होता. या वेळी मतचोरीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा हवाच, त्यासोबत अटकही व्हावी, अशी भूमिका या तरुणींनी मांडली. यातील अनेकजणी पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

शिवाजी पार्कमध्ये दुसऱ्यांदा ‘सीजीपी’ने आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला तरुणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून १८ ते ३० वयोगटातील तरुणी दाखल झाल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक तरुणी शिवाजी पार्कमध्ये यापूर्वी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या. आंदोलनस्थळी ‌‘ज्ञानेशकुमार राजीनामा द्या‌’, ‌‘एसआयआर प्रक्रिया बंद करा‌’ अशा घोषणांसह फलक झळकत होते.

मतचोरी रोखण्यासाठी कडक नियम असायला हवेत. ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा झाल्यानंतर पुन्हा असा प्रकार घडायला नको, याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे.
- महाम सय्यद, मुंबई

मतदारयादीतून कोट्यवधीचे नाव वगळणे, हा मोठा घोटाळा आहे. नागरिकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला तर लोकशाही काय राहिली.
-अन्नू, मुंबई

मतचोरीवर लोकांनी सातत्याने आवाज उठवून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा केवळ राजीनामा नको, तर त्यांना अटक व्हायला हवी.
- स्वराली वरठा, पालघर

मतदान करूनही भलतेच उमेदवार निवडणूक जिंकत आहेत, तर निवडणुकीचा फायदा काय आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार सर्वोच्च आहे, त्याच्यावर घाला घातला जातोय.
- वर्षा सांगोले, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com