

जमावबंदी आदेश झुगारला
वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्गाविरोधात आंदोलन
डहाणू, ता. २ (बातमीदार) ः वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्गालगतच्या सेवा रस्त्याचे काम सुरळीत होण्यासाठी शासनाने येथे पाचशे मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश शुक्रवारी (ता. २) सविनय कायदेभंग आंदोलनाद्वारे दोन हजार आंदोलकांनी मोर्चाने सेवा रस्त्यावर जाऊन प्रतीकात्मक दगड उचलून जमावबंदी आदेश झुगारून दिला.
गांधी जयंतीनिमित्त वरोर धरणे आंदोलनस्थळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, भूमी सेना, आदिवासी एकता परिषद, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि विविध सामाजिक संघटना एकत्रि आल्या होत्या. आमदार कॉ. विनोद निकोले, विश्वनाथ पाटील, गिरीश राऊत, कॅप्टन सत्यम ठाकूर, प्रशांत पाटील, नारायण पाटील, रामकृष्णा तांडेल, भावेश चूरी, विनीत पाटील, मिलिंद राऊत, वर्षा वायडा, डॉ. सुनील पराड आदी नेते यात सहभागी झाले होते. या वेळी शासनाचे प्रतिनिधी डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांना नारायण पाटील, रामकृष्ण तांडेल यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.