

घटनात्मक संस्था उद्ध्वस्त
करणाऱ्या सरकारला संपवा
जेन-झीची सरकारविरोधात आक्रमक भूमिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : केंद्रातील भाजप सरकारकडून सातत्याने हस्तक्षेप करून घटनात्मक संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. न्यायालय, निवडणूक आयोगासारख्या संस्थांची स्वयत्तता धोक्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला संपवा, अशा संतप्त प्रतिक्रिया शुक्रवारी जेन-झीने शिवाजी पार्क येथील आंदाेलनात व्यक्त केल्या.
काक्रोच जनता पार्टीच्या वतीने अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली जेन-झीने आज सायंकाळी दादर शिवाजी पार्क येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन केले. या वेळी येथे आलेल्या तरुणाईकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता.
-----
सरकार वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबू पाहत आहे. आता तरुणाई रस्त्यावर उतरल्याने ते हा आवाज दाबू शकणार नाहीत. सरकारला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल.
- मनीष कुमार
-------
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आणि नि:पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारने त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा आजच्या आंदोलनाची धग दिल्लीच्या सत्तेपर्यंत पोहोचेल.
- अभिषेक चोमाल
-----
मुंबईपासून सुरू झालेल्या आंदोलनाची धग नक्कीच दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सरकारने त्याची दखल घेऊन ज्ञानेशकुमारांना घरचा रस्ता दाखवावा.
- अजित कुमार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.