

आंदोलनाला सेलिब्रिटींची हजेरी
रिया अहिर मात्र अनुपस्थित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कॉक्रोच जनता पार्टीच्या शिवाजी पार्क आंदोलनाला सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या हजेरीमुळे उपस्थित तरुणाईच्या उत्साहात अधिकच भर पडल्याचे चित्र होते. दुसरीकडे शिवाजी पार्कच्या या आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिया अहिरची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.
शिवाजी पार्कच्या आजच्या आंदोलनात बॉलीवूड अभिनेते नसिरुद्दिन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, गायक विशाल ददलानी आणि शर्लिन चोप्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. ददलानी यांनी ‘रंग दे बसंती’ या गाण्यावरून एक गाण गायले. त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अभिनेता नसरुद्दीन शहा यांनी ‘तुम्ही अतिशय चांगले काम करीत आहात,’ असे म्हणत अभिजित दीपके यांना शुभेच्छा दिल्या.
...
कोणत्याही दबावाला बळी न पडता मुंबईकरांनी शिवाजी पार्क येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हजेरी लावली, ही आनंदाची बाब आहे. सरकारने नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर घाला घातला. त्यांचे नाव मतदार यादीतून गायब केले. त्यामुळे हा आक्रोश होणारच होता. सरकारवरील नाराजीचे आंदोलनात रूपांतर झाले. लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. तो सरकार हिरावून घेऊ शकत नाही.
- शबाना आजमी, ज्येष्ठ अभिनेत्री
...
हे दृश्य खरोखरच खूप सुंदर आहे. दिल्लीमध्ये अभिजितसोबत राहण्याची संधी मला मिळाली नाही; मात्र येथे त्याच्यासोबत राहण्याची संधी मिळत आहे. हे आंदोलन जोपर्यंत निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा येत नाही तोवर सुरूच राहणार आहे.
- विशाल ददलानी, गायक
...
मतदानाचा अधिकार हा सर्वांत महत्त्वाचा अधिकार आहे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांकडून हा अधिकार हिसकावता कामा नये.
- शर्लिन चोप्रा, अभिनेत्री
...
रिया अहिरची पाठ
शिवाजी पार्कमध्ये यापूर्वी झालेल्या सीजीपीच्या आंदोलनादरम्यान पोलिस व्हॅन थांबवून देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिया अहिरने आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. रियाची अनुपस्थिती अनेक तरुणांनी बोलून दाखवली. महिला सुरक्षेसाठी एक मोहीम हातात घेतली आहे. त्यात व्यग्र असल्यामुळे या आंदोलनात आले नसल्याचे तिने ‘सकाळ’ला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.