विहिरीत उडी घेऊन मायलेकांची आत्महत्या, सुतारवाडीत धक्कादायक घटना

विहिरीत उडी घेऊन मायलेकांची आत्महत्या, सुतारवाडीत धक्कादायक घटना
Published on: 

रोह्यात विहिरीत उडी घेऊन मायलेकाची आत्महत्या
रोहा, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील सुतारवाडी येथील खिलारे फार्महाऊसमध्ये विहिरीत उडी घेऊन मायलेकानी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आली. मनीषा काशिकर (८०) आणि मंदार काशिकर (४३) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मूळचे पुण्याचे असून, फार्महाऊसवर काम करीत होते. सततच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी (ता. ३) सकाळी विहिरीत मनीषा यांचा मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच कोलाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महेश सानप यांच्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, विहिरीजवळ महिला आणि पुरुषाच्या चपला आढळल्या. त्यामुळे मंदारही विहिरीत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पथकाने विहिरीत शोधमोहीम राबवली. त्यात मंदार यांचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मायलेकाला काही काळापासून आजारपणाचा त्रास होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com