तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
Published on: 

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

प्रवाशांचे होणार हाल; रूळदुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची कामे करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर  २०२६ला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाउन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप-डाउन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या  बोरिवली-राम मंदिर अप जलद आणि पाचव्‍या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी-विद्याविहार अप-डाउन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
---------------
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल-वाशी  अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी  ११. ०५ ते ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल-ठाणे आणि ठाणे-पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.  ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावतील.  
------------
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली-राम मंदिर स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर
कधी : सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. पाचव्या मार्गिकेवरील सर्व लोकल अंधेरी-बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. काही लोकल अंधेरी-बोरिवलीदरम्यान हार्बर मार्गावरून गोरेगाववरून वळवण्यात येतील.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com