‘प्रयास’ करणार अत्याचारग्रस्तांमध्ये उमेद

‘प्रयास’ करणार अत्याचारग्रस्तांमध्ये उमेद
Published on: 

अत्याचारग्रस्तांमध्ये निर्माण करणार उमेद
‘प्रयास’च्या पुढाकाराने देशभरातील एनजीओंचा परिसंवाद
मुंबई, ता. ३ : अत्याचार, हिंसाचार, गुन्हेगारी किंवा प्रतिकूल परिस्थितीचे बळी ठरलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पीडितांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ‘प्रयास’चा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून देशभरातील सेवाभावी संस्थांचा दोनदिवसीय परिसंवाद ‘दोबारा’ मुंबईत पार पडला.
सरकारने पीडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य ध्यावे, त्यांच्या आयुष्यातील संकट हे केवळ त्या घटनेपुरते मर्यादित राहत नाही. त्यानंतरचे सामाजिक बहिष्करण, मानसिक धक्का, आर्थिक असुरक्षितता आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक पीडित व्यक्तींना पुन्हा सामान्य आयुष्य जगता येत नाही. अशा व्यक्तींना केवळ सहानुभूतीची नव्हे, तर सन्मानाने पुन्हा उभे राहण्यासाठी ठोस पुनर्वसनाची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर ‘प्रयास’सह विविध सामाजिक संस्था पीडित व्यक्तींना आधार देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. समुपदेशन, कायदेशीर मदत, शिक्षण, रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांतून त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
अत्याचारग्रस्त व्यक्तीला ‘पीडित’ म्हणून कायमची ओळख न देता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देणे, हेच खरे पुनर्वसन ठरते. समाजानेही अशा व्यक्तींकडे संशयाने किंवा दयेच्या नजरेने न पाहता त्यांना स्वीकारण्याची आणि मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे मत ‘प्रयास’चे प्रकल्प संचालक विजय राघवन यांनी व्यक्त केले.
----
नव्याने जगण्याचा हक्क!
सरकारच्या विविध पुनर्वसन योजना, आर्थिक मदत, कायदेशीर संरक्षण आणि रोजगाराच्या संधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी सरकार आणि पीडित व्यक्तींमधील दुवा म्हणून काम केल्यास मदतीची प्रक्रिया अधिक परिणामकारक होऊ शकते. त्या व्यक्तीला सुरक्षितता, सन्मान, स्वावलंबन आणि नव्याने आयुष्य उभे करण्याची संधी मिळणे हा तिचा मूलभूत मानवी हक्क आहे, असे मत प्रा. राघवन यांनी व्यक्त केली.
----
समाजातील दुर्बल घटक, पीडित व्यक्तींचे प्रश्न घेऊन आपण आतापर्यंत सरकारकडे जात होतात; मात्र आता सरकारच एनजीओंकडे येत आहे, ही बाब महत्त्वाची आहे.
- डॉ. संजय चहांदे, माजी निवृत्त सनदी अधिकारी
-----
MUM26-F53876

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com