

उल्हासनगरात युती तुटताच शिवसेनेचा भाजपवर पलटवार
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना-भाजप युती तुटल्याची घोषणा भाजपने केल्यानंतर उल्हासनगरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने शिवसेनेतील नेत्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते कमलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर पलटवार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा एकेकाळी मंचेकर टोळीशी संबंध असल्याचा आरोप निकम यांनी या वेळी केला.
भाजपच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेची पत्रकार परिषद झाली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल करणारे भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यावर फाईल चोरीचा, तर कपिल अडसूळ यांच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचा दावा निकम यांनी केला. त्यामुळे दोघांचे अर्ज बाद झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप नेते कुमार आयलानी यांच्यावरही निकम यांनी आरोप केले. अरुण आशान म्हणाले, की भाजपने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून, या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी. युती तुटल्याने जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे शिवसेना पूर्ण ताकदीने काम करेल.
आमदार डॉ. बालाजी किणीकर म्हणाले, की गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी माझ्याविरोधात काम केले. यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे असून, योग्य वेळी ते जाहीर करीन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.