

भाजपसोबत १० वर्षे, आरपीआयला काय मिळाले?
रामदास आठवले यांचा महायुतीतील मित्रपक्षांना रोखठोक सवाल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : भाजपसोबत २०१४ पासून निष्ठेने राहूनही रिपब्लिकन पक्षाला सत्तेत अपेक्षित वाटा आणि विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही आरपीआयला अपेक्षित जागा मिळत नसल्याचे सांगत महायुतीतील मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला न्याय्य सत्तावाटा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आरपीआयच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रिपदासह विधान परिषदेचे प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पूर्वी शरद पवार यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा दिल्या होत्या, असा दाखला देत आठवले यांनी भाजपसोबतच्या प्रदीर्घ राजकीय सहकार्याचा मुद्दा उपस्थित केला. पूर्वी शरद पवार यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या तब्बल सात जागा दिल्या होत्या, याचा दाखला देत २०१४ पासून भाजपसोबत निष्ठेने राहूनही आरपीआयला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत आठवले यांनी बोलून दाखवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मजबूत रिपब्लिकन पक्ष उभा करता आला नसल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी सर्व रिपब्लिकन पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मणिपूरमध्येही रिपब्लिकन पक्षाचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, असा दावा त्यांनी या वेळी केला. निवडणूक आयोगावरील टीकेबाबत बोलताना मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील हत्येच्या घटनेचा संदर्भ देत राजकीय हत्या ही महाराष्ट्राची परंपरा नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
----
ठाकरे बंधूंवर टीका
सत्तेत नसल्यामुळे ठाकरे बंधूंकडे दुसरे काम उरलेले नाही, म्हणूनच ते मोर्चे काढत असल्याची टीका आठवले यांनी केली. सत्तेपासून दूर राहावे लागल्याने शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मूळ भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकेकाळी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीत सत्य समोर येईल, असे सांगत कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे आठवले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.