

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : कळव्यापाठोपाठ नौपाडा परिसरात सापळा रचून ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत कल्याणमधील समीर सलीम पठाण (वय ४५) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल एक किलो ४२० ग्रॅम एमडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४२ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार अमोल देसाई यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कल्याणमधील पत्रीपूल येथील समीर पठाण हा नौपाड्यातील गुरुकुल सोसायटीजवळील नाशिक-मुंबई वाहिनीवरील पादचारी पुलाजवळ एमडी विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, सहाय्यक निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, कर्मचारी प्रशांत निकुंभ, अनुप राधे आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथकाने सापळा लावून मध्यरात्रीच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील एमडीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार ४२ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय १५ हजारांचा फोन आणि ५६० रुपये रोख जप्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.