

स्वच्छतेला तंत्रज्ञानाची जोड
सेवा संकल्प अभियानात २३ ई-कचरा वाहनांतून पर्यावरण रक्षणाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : सेवा संकल्प अभियाननिमित्त पालिकेने शहरभर सेवा योगदान आणि स्वच्छतेच्या उपक्रमांचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर आणि देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत आपले स्थान भक्कम राखणाऱ्या नवी मुंबईने या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श देशासमोर ठेवला आहे.
नवी मुंबई पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात हिरवळीवर स्वच्छ भारत मिशनचे बोधचिन्ह असलेल्या महात्मा गांधीजींच्या चष्म्याचे प्रतीक रांगोळीतून साकारले होते. नागरिकांच्या आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या या उत्साही सहभागाची दखल घेत केंद्रीय स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत समाज माध्यमांवरून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. स्वच्छतेची हीच लय कायम राखत कोपरखैरणे येथे आणखी एक लक्षवेधी उपक्रम पार पडला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली २३ प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक कचरा वाहतूक वाहनांची ‘स्वच्छता ही सेवा’ अर्थात इंग्रजी ‘एसएचएस’ या अक्षररचनेत नेटकी मांडणी करण्यात आली होती. या उपक्रमातून स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासूनच होते हा मूलमंत्र अधोरेखित करण्यात आला. पर्यावरणपूरक ई-वाहनांचा वापर करून शहरात स्वच्छतेसोबतच प्रदूषणमुक्तीचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.