

किनाऱ्यावरील सुरक्षेचा आढावा
पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जीवरक्षकांना सतर्कतेच्या सूचना
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : श्रीवर्धन-दिवेआगर येथे विद्यार्थ्यांसोबत समुद्रात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य करण्यापेक्षा संभाव्य घटना टाळण्यावर भर देण्याच्या उद्देशाने अलिबाग नगरपरिषदेचे सभापती प्रशांत नाईक यांनी शनिवारी (ता. ३) अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या सर्व जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या अलिबाग समुद्रकिनारी चार पुरुष आणि एका महिला जीवरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी एक स्पीडबोट, स्ट्रेचर आणि लाइफ जॅकेट्स उपलब्ध आहेत. तसेच भरती-ओहोटीची माहिती देण्यासाठी सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे.
सभापती प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे आणि अभियंता मुंडे यांनी जीवरक्षकांची तैनाती, बचाव बोटी, सुरक्षा साधने, पर्यटकांची अधिक वर्दळ असलेली ठिकाणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेतला.
संभाव्य धोके ओळखण्यावर भर
समुद्रकिनारी केवळ जीवरक्षक आणि बचाव बोटी उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, संभाव्य धोका असलेल्या ठिकाणांची आधीच ओळख होणे आवश्यक आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या वेळी धोका वाढू शकतो, याचे पूर्वनियोजन करून त्यानुसार सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यावर या वेळी भर देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.