ठाकरेंचा मोर्च्यातील इतर भाषणे -

ठाकरेंचा मोर्च्यातील इतर भाषणे -
Published on: 

ज्ञानेशकुमार कठपुतळी!
- अनिल देशमुख
निवडणुका जिंकणे हे कोणत्याही पक्षाचे उद्दिष्ट असते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गैर नाही; पण निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक जिंकणे गैर आहे. भाजप निवडणूक आयोग आणि ज्ञानेशकुमारला हाताशी धरून एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ज्ञानेशकुमार भाजपच्या हातातील कठपुतळी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात निवडणुका पारदर्शक होण्यासाठी त्यांचा राजीनामा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
...
हुकूमशाहीच्या पराभवाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल!
- शशिकांत शिंदे
निवडणुकीच्या कार्यपद्धती आणि मनमानीविरोधात आज प्रचंड मोर्चा निघाला आहे. मात्र, भाजप निवडणूक आयोगाचे समर्थन करीत आहे. याचा अर्थ तुम्ही त्या षड्‍यंत्रामागे आहात. हुकूमशाहीच्या पराभवाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.
...
मतचोरीविरोधात देशभर असंतोष
- बाळासाहेब थोरात
आजचा निवडणूक आयोगाविरोधात असलेला हा मोर्चा महाप्रचंड मोर्चा आहे. देशामध्ये एक वातावरण निर्माण झालेले आहे. जनतेने ओळखले आहे की आपल्या मताची चोरी होत आहे. राहुल गांधी यांनी अनेक वेळा या मतचोरीबाबत सांगितले, पुरावे दिले; पण कुणीही गांभीर्याने घेतले नाही. आता तो पुरावा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बाहेर आल्याने संपूर्ण देशामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
...
या मान्यवरांची उपस्थिती
मोर्चावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, मनसेचे नितीन सरदेसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com