भातशेतीसाठी थेट सूर्या कालव्याचे पाणी

भातशेतीसाठी थेट सूर्या कालव्याचे पाणी
Published on: 

भातशेतीसाठी थेट सूर्या कालव्याचे पाणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पालघर, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. पावसाअभावी अनेक ठिकाणी भाताची उभी पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार राजेंद्र गावित यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून सूर्या कालव्याचे पाणी भातशेतीसाठी सोडण्याची मागणी केली. एकीकडे वाढती महागाई, शेतीसाठी अपुरे मनुष्यबळ आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने उभे भातपीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र गावित यांच्यासमोर व्यक्त केली होती.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या या तातडीच्या प्रयत्नामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. “शेतकऱ्यांचे उभे पीक वाचणे महत्त्वाचे आहे. पावसाने साथ दिली नाही तरी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना आवश्यक पाणी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे,” अशी भूमिका आमदार राजेंद्र गावित यांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com