

आदिवासी बांधवांना ७/१२ उतारे
सेवा संकल्प अभियानात फणसवाडीतील नागरिकांना कागदपत्रांचे वितरण
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पनवेल तहसील कार्यालयाच्या वतीने फणसवाडी येथे आदिवासी बांधवांना गाव नमुना ७ ई (७/१२) उताऱ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पवन चांडक आणि तहसीलदार मिनल भामरे यांच्या हस्ते फणसवाडी येथील आदिवासी बांधवांना गाव नमुना ७ ईचे वितरण करण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत झाली.
या वेळी कसळखंडचे सरपंच संजय घरत, उपसरपंच गिरीश पाटील, भाताणचे सरपंच तानाजी पाटील, स्थानिक ग्रामस्थ अजित पाटील आणि कसळखंडचे पोलिस पाटील प्रवीण पाटील उपस्थित होते.
अभियान यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पळस्पे महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी शशिकांत सानप, कसळखंडचे तलाठी विनय पाटील, पळस्पेच्या तलाठी प्रिया वैती, कोळखेचे तलाठी अमित ताथवडे आणि विचुंबेचे तलाठी सचिन पवार यांनी यासाठी सहभाग घेतला.
कागदपत्रांचे वितरण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उतारे मिळाल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.