स्वप्नातले घर आता डोळ्यांसमोर!

स्वप्नातले घर आता डोळ्यांसमोर!
Published on: 

स्वप्नातले घर आता डोळ्यांसमोर!
आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत बेलापूरमध्ये एसआरएचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवन येथे एसआरए योजनेअंतर्गत विशेष सादरीकरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सादरीकरणाद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांची रचना, इमारतीचे आधुनिक स्वरूप, विविध सुविधा आणि योजनेच्या पुढील टप्प्यांची सविस्तर माहिती प्रत्यक्ष दाखवण्यात आली. आपले भावी घर डोळ्यांसमोर साकारताना पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मंदा म्हात्रे म्हणाल्या की, आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. सामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी युक्त घर मिळावे यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, एसआरए योजनेच्या माध्यमातून साकार होणारी ही घरे लाभार्थ्यांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षितता आणि नवा आत्मविश्वास घेऊन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या महत्त्वाकांक्षी योजनेचा भूमिपूजन सोहळा लवकरच पार पडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या सादरीकरण कार्यक्रमाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे येथील कार्यकारी अभियंता सय्यद सलीम, भूमापक श्रीनिवास राऊत, तसेच आर्किटेक्ट आकाश बर्डे, सचिन कदम व रोहित यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पाटील, मनोज म्हात्रे, राजू कोळी आणि किशन राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले, तर अ‍ॅड. संतोष पळसकर यांनी कायदेशीर बाबी आणि प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com