

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत कासारवडवलीतील ४३ वर्षीय व्यक्तीची १४ लाख ३५ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. फेसबुकवरील जाहिरातीपासून सुरू झालेला हा प्रकार व्हॉट्सॲप गट आणि ‘येस सिक्युरिटीज’च्या नावाने तयार केलेल्या बनावट संकेतस्थळापर्यंत पोहोचला. पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.
कासारवडवली परिसरातील सर्वेश कुमार यांना ४ सप्टेंबरला फेसबुकवर शेअर बाजारातील गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याची जाहिरात दिसली. जाहिरातीतील दुव्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना ‘येस सिक्युरिटीज’ नावाच्या व्हॉट्सॲप गटात सहभागी करण्यात आले. निताशा शंकर नावाची महिला गटाची प्रशासक आणि सल्लागार असल्याचे सांगण्यात आले. तिच्याकडून विविध शेअर आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीचे सल्ले देण्यात आले.
त्यानंतर ‘yesinstitutional-com’ नावाची संकेतस्थळाची लिंक देऊन त्यावर खाते उघडण्यास सांगण्यात आले. या संकेतस्थळावर गुंतवणुकीची रक्कम नफ्यासह वाढत असल्याचे दिसत होते. त्यावर विश्वास ठेवून सर्वेश यांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण १४ लाख ३५ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. काही दिवसांत त्यांच्या खात्यावर नफ्यासह तब्बल ४८ लाख रुपये जमा झाल्याचे संकेतस्थळावर दाखविण्यात आले. त्यांनी १५ लाख रुपये काढण्याची विनंती केली असता ती नाकारण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयपीओसाठी आणखी ४९ लाख ३३ हजार ४७७ रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. संशय आल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या ग्राहकसेवेशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.