कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलला ‘बेस्ट परफॉर्मिंग केव्हीके’ पुरस्कार

कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलला ‘बेस्ट परफॉर्मिंग केव्हीके’ पुरस्कार
Published on: 

कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिलला ‘बेस्ट परफॉर्मिंग केव्हीके’ पुरस्कार

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारातील उल्लेखनीय कामगिरीची दखल

कासा, ता. ४ (बातमीदार) : कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्राला भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत अटारी, पुणे यांच्या वतीने आयोजित नवव्या झोनल वर्कशॉपमध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग केव्हीके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयसीएआरचे माजी सहसंचालक डॉ. पी. दास यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या या झोनल वर्कशॉपमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील ८२ कृषी विज्ञान केंद्रांच्या २०२५ या वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिलचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केंद्रामार्फत वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी ज्ञान पोहोचविणे, शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके तसेच स्थानिक गरजांनुसार विविध उपक्रम राबविण्याची केंद्राची कामगिरी यांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देण्याचे कार्य कृषी विज्ञान केंद्रामार्फत गेल्या ५० वर्षांपासून सुरू आहे. सुधारित पीक तंत्रज्ञान, एकात्मिक पीक व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, फळबाग, भाजीपाला उत्पादन, फळप्रक्रिया, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय तसेच विविध कृषीपूरक व्यवसायांबाबत केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाते. या पुरस्कारामुळे कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, कृषितज्ज्ञ आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा गौरवाचा क्षण ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com