

वानगावमध्ये रोजगार महाकुंभ
७१ उमेदवारांना जागेवर नियुक्तीपत्र
कासा, ता. ४ (बातमीदार) : पद्मश्री जिव्या सोमा मशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वानगाव येथे २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ पार पडली. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्यविकास आयुक्त मनीषा वर्मा आणि संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ४०० ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. वानगाव येथील मेळाव्यास २५७ उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी ७१ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड होऊन त्यांना जागेवरच नियुक्तीपत्रे देण्यात आली. मेळाव्यात सात कंपन्यांचे अधिकारी व उद्योजक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नोडल अधिकारी प्रशांत बोकंद होते. गटनिदेशिका एस. एस. चुरी यांच्या नियोजनातून मेळावा यशस्वीरीत्या पार पडला. संस्थेचे प्राचार्य एस. पी. संखे यांचे मार्गदर्शन लाभले. मेळावा यशस्वी करण्यासाठी बीटीआरआयचे क. प्र. स. बेंडकुळे, कार्यकारी अधिकारी गायकवाड, काळे, वैभव भोईर, प्रशांत पिंपळे यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.