डोंबिवलीत अकरावे ‘नांदी संमेलन’ उत्साहात

डोंबिवलीत अकरावे ‘नांदी संमेलन’ उत्साहात
Published on: 

सकाळ वृत्तसेवा 
डोंबिवली, ता. ५ : साहित्यनगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत अकरावे ‘नांदी संमेलन’ उत्साहात पार पडले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. आगामी १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संमेलनात साहित्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत विविध विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रे घेण्यात आली.

‘माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि साहित्य’ हा संमेलनाचा प्रमुख विषय होता. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होत असलेले बदल, करिअरच्या नव्या संधी तसेच रोजगार विश्वावर होणारे परिणाम यावर मान्यवरांनी विचार मांडले. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात मराठी भाषा आणि साहित्याचे स्थान काय असेल, यावरही सखोल चर्चा करण्यात आली. साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला जोडणारे व्यासपीठ म्हणून नांदी संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
संमेलनाला समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, साहित्यिक अरुण शेवते, श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा. डॉ. विनय भोळे, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने, ‘डोंबिवलीकर’ मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले यांच्यासह साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेला सक्षम करण्याची गरज
 प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी, ‘मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान आहे. साहित्य आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात मराठी भाषेचे स्थान अधिक सक्षम करण्याची गरज आहे. नांदी संमेलन हे साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारांना जोडणारा संवादमंच आहे’, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com