मुरबाडच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्यातून जनजागृती

मुरबाडच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्यातून जनजागृती
Published on: 

मुरबाड, ता. ५ (वार्ताहर) : सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाडच्या अकरावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याचा अभिनव मार्ग अवलंबला आहे. ‘योजना तुमच्या दारी, प्रगती आपल्या घरी’ या विषयावर विद्यार्थ्यांनी शाळेत पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
पथनाट्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘पीएम किसान सन्मान निधी’, ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’, ‘लेक लाडकी’, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ यांसारख्या योजनांची माहिती सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडण्यात आली. संबंधित योजनांचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा आणि आवश्यक प्रक्रिया काय आहे, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. सध्या शाळेत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले असून, लवकरच मुरबाडच्या मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसरातही पथनाट्य सादर केले जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. ‘पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अल्पावधीत प्रभावी पथनाट्य सादर केले,’ असे प्राचार्य राकेश पाडवी यांनी सांगितले. या उपक्रमासाठी विज्ञान विभागप्रमुख पवार यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com