

अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : घरासमोर गाडी लावण्यावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने अंबरनाथ पश्चिमेतील गाडगेनगर परिसरात चॉपरने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक केली आहे.
गाडगेनगर येथील शिवसेना शाखेजवळ ॲड. महेश वाळुंज आणि विष्णू वाळुंज यांचे घर व कार्यालय आहे. येथे गाडी लावण्यावरून शुक्रवारी (ता. २) सायंकाळी वाद झाला. त्यानंतर विशाल जाधव ऊर्फ छोट्या आणि तुषार जाधव ऊर्फ बाप्या हे काही जणांसह तेथे आले. त्यांनी विष्णू आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा दावा आहे. तुषारने विष्णू यांना पकडून ठेवले, तर विशालने चॉपर काढून त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप वाळुंज यांनी पोलिस तक्रारीत केला आहे. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विशालला पोलिसांनी अटक केली असून, तुषारचा शोध सुरू आहे.
हत्याराचा वापर नाही
घटनास्थळी केवळ शाब्दिक वाद झाला असून, कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच घटनेच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य समोर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महेश हे त्रास देत असून पैशांची मागणी करीत असल्याचाही आरोप संशयितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आरोप फेटाळले
महेश यांनी हे आरोप फेटाळले असून, संशयितांना वाचवण्यासाठी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.