हर्णे गुरुजी विद्यालयाची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर

हर्णे गुरुजी विद्यालयाची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर
Published on: 

हर्णे गुरुजी विद्यालयाची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर
विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकासासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांची दखल
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) यांच्या स्‍कूल लीडरशिप अकॅडमीअंतर्गत २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या स्‍कूल सक्‍सेस स्‍टोरीज-केस स्‍टडी डॉक्‍यूमेंटेशन उपक्रमासाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, हर्णे गुरुजी विद्यालय, वांद्रे (पूर्व) या शाळेच्या शैक्षणिक कार्याची यशोगाथा निवडण्यात आली आहे.
ही यशोगाथा एनआयईपीए, एनसीएसएल नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शाळेच्या यशोगाथेचा विषय ‘विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न’ असा असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल यात घेण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, परिणामकारक अध्यापन, अभ्यासक्रमाधारित अध्ययन, जीवनाभिमुख शिक्षण, जीवनमूल्ये, मूल्याधारित शिक्षण, सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थी विकास या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन आणि पालकांचा सहभाग यामुळे शाळेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
मुख्याध्यापिका शिल्पा अष्टमकर यांनी सांगितले, की हे यश केवळ एका व्यक्तीचे किंवा एका घटकाचे नसून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक प्रयत्न, शैक्षणिक समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची सातत्यपूर्ण बांधिलकी यामुळे ही यशोगाथा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. शाळेसाठी ही निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com