

पूर्णेकर हत्या प्रकरण
पप्प्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील सतीश ऊर्फ पप्प्या शिंदे याला सोमवारी (ता. ५) ठाणे न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही हत्या निर्दयपणे करण्यात आली असून, पप्प्या शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी सतीश ऊर्फ पप्प्या शिंदे याला अटक केली. त्या वेळी त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर (आज) सोमवारी त्याला न्यायाधीश एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी तपासातील माहिती न्यायालयासमोर मांडली. पप्प्या शिंदे याने मारेकऱ्यांना घटनास्थळावरून पसार होण्यासाठी कारची व्यवस्था केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच त्याने वापरलेला मोबाईल क्रमांक दुसऱ्याच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कॉल डिटेल रेकॉर्डनुसार (सीडीआर) पप्प्या शिंदे हा इतर आरोपींच्या संपर्कात सुमारे १५० वेळा असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपी, हत्येचा कट आणि पप्प्या शिंदेची भूमिका याबाबत अधिक तपास करायचा असल्याने पोलिसांनी आणखी नऊ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.