घाटकोपर-वर्सोवा मार्गावर सहा डब्यांची मेट्रो धावणार

घाटकोपर-वर्सोवा मार्गावर सहा डब्यांची मेट्रो धावणार
Published on: 

घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची मेट्रो धावणार

मेट्रो वनकडून २२ डबे खरेदीची प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील पहिला मेट्रो प्रकल्प असलेल्या घाटकोपर-वर्सोवा मार्गावर लवकरच सहा डब्यांची मेट्रो ट्रेन धावणार आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असून, सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सध्याच्या चार डब्यांच्या मेट्रो ट्रेनला अतिरिक्त दाेन डबे जाेडण्याची मेट्रो वनची योजना आहे. त्यासाठी २२ डबे खरेदी करण्याची मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेनने (एमएमओपीएल) प्रक्रिया सुरू केली आहे.

घाटकोर-अंधेरी-वर्सोवा या सुमारे साडेअकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर दररोज साडेचार-पाच लाख प्रवासी ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी मेट्रोला मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या मार्गावर चार डब्यांच्या मेट्रो ट्रेन धावत असून, त्याची १,१७८ एवढी प्रवासी क्षमता आहे. या मार्गावर मेट्रोला आणखी दोन डबे जोडल्यानंतर मेट्रो ट्रेनची प्रवासी क्षमता १,७९२पर्यंत वाढू शकणार आहे. त्याचाच भाग म्हणून अतिरिक्त २२ डबे खरेदी केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक क्षमता ५० टक्क्यांनी वाढणार आहे.

सध्याच्या मेट्रो गाड्या आणि यंत्रणांसोबत हे नवीन डबे अखंडपणे जोडले जावेत यासाठी विद्यमान मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांचे तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. दरम्यान, मेट्रो वनने अतिरिक्त मेट्रो डब्यांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याची प्रगती सध्या सुरू असलेल्या आर्थिक पुनर्रचना आणि निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे. तसेच अतिरिक्त डब्यांची, त्याची जोडणी आणि प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी आर्थिक सहाय्य वेळेवर मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com