बलात्कारप्रकरणी फाशीच्या शिक्षेची तरतूद करा

बलात्कारप्रकरणी फाशीच्या शिक्षेची तरतूद करा
Published on: 

अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करून बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी करणारा अशासकीय ठराव अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल शेख यांनी हा ठराव मांडला. नगरसेविका रोहिणी भोईर यांनी त्यास अनुमोदन दिले.
देशाच्या विविध भागांत महिला व मुलींवर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांचा ठरावाद्वारे निषेध करण्यात आला. महिलांची सुरक्षितता, सन्मान, स्वातंत्र्य आणि समान हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी व नागरिकांशी एकजूट व्यक्त करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेबरोबरच लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांसाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावीत, तपासापासून न्यायालयीन सुनावणीपर्यंतची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशी मागणी ठरावात करण्यात आली. पीडित महिला व साक्षीदारांचे संरक्षण, गोपनीयता, मोफत कायदेशीर मदत, वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली. महिला सुरक्षेसाठी केवळ कायदे कठोर करण्याबरोबरच समाजात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे शेख यांनी सभेत सांगितले. सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावाची प्रमाणित प्रत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय कायदा व न्यायमंत्री, केंद्रीय महिला व बालविकासमंत्री, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवावी, अशी मागणीही शेख यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com