

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : वैद्यकीय व्यवसाय करण्याकरिता पदवी नसताना रुग्णांवर ॲलोपॅथिक उपचार केल्याचे शहरातील नादियापार परिसरात उघडकीस आले आहे. भिवंडी पालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शांतीनगर भागातील नादियापार भागातील मेराज मशिदीजवळ अस्मा अपार्टमेंटमध्ये मोहम्मद अकील मोहम्मद हलीम खान (वय ४१) हा ‘झिशान पाईल्स डिस्पेंसरी’ या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत होता. त्याच्याकडे आवश्यक असलेली वैध वैद्यकीय पदवी किंवा प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्याने आपल्या नावापुढे ‘बीएएमएस’ ही वैद्यकीय पदवी लिहून स्वतःला विशेष पात्र डॉक्टर म्हणून सादर केले. या प्रकरणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद शोएब अब्दुल हमीद अन्सारी यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
साहित्य ताब्यात
मोहम्मद अकील खान हा रुग्णांना ॲलोपॅथिक औषधे आणि वैद्यकीय साहित्य देऊन त्यांच्यावर उपचार करत असल्याचा दावा आहे. त्याच्या दवाखान्यात मिळालेले सुमारे १५ हजारांचे ॲलोपॅथिक औषधांचा आणि वैद्यकीय साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीवन मस्के करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.