अंबरनाथच्या विकासावर बांधकाम क्षेत्राशी चर्चा

अंबरनाथच्या विकासावर बांधकाम क्षेत्राशी चर्चा
Published on: 

अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : शहराचा वाढता विस्तार आणि त्यानुसार आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास यासंदर्भात अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशन आणि आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेतली. या वेळी शहर विकासासह बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याचा विषय, यूएलसी कायद्याची अंमलबजावणी, बांधकाम परवानग्यांशी संबंधित अडचणी; तसेच विकास प्रक्रियेत येणाऱ्या विविध प्रशासकीय प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा विकास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होण्यासाठी पालिका आणि बांधकाम क्षेत्रातील घटकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट्सना विविध परवानग्या व मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, अंबरनाथच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही बिल्डर असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा यांनी दिली. या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव, यांच्यासह अंबरनाथ-बदलापूर परिसरातील बिल्डर, आर्किटेक्ट तसेच अंबरनाथ पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक चर्चा
शहरातील पायाभूत सुविधांचा विस्तार करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शहरातील रस्ते, यूएलसी कायद्याची अंमलबजावणी आणि विकसकांच्या विविध अडचणींवर तोडगा काढण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com