

पटनीतील कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गिका द्या
नगरसेविका वैशाली रेवेंद्र पाटील यांची मागणी
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूक सुलभ करण्यासाठी दिघा येथील पटनी मैदान ते विमानतळ असा सुमारे २६ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तसेच कोपरी-पटनी पुलासह बहुउद्देशीय कॉरिडॉर प्रस्तावित करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, मात्र यामुळे दिघा येथील पटनी परिसरात कोंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाने आतापासूनच यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे.
दिघा येथील पटनी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रहिवासी टोलेजंग इमारती, डेटा सेंटर तसेच आयटी पार्क विकसित झाले आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर सध्या कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यातच पटनीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणारा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीवर ताण येऊ शकतो. यामुळे नागरिकांसाठी स्वतंत्र चढ-उतार मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी वैशाली पाटील यांनी केली आहे. पटनी येथील महावितरणच्या सबस्टेशनजवळ उन्नत मार्गावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात यावी. तसेच, ठाणे-बेलापूर मार्गावरील एमआयडीसीच्या गवतेवाडी परिसरातून पटनी रस्त्यावरील महावितरणच्या सबस्टेशनपर्यंत स्वतंत्र जोडमार्गिका विकसित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिणामी, पटनी परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन कोंडीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास वैशाली पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.