

उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे; तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभाग, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत ‘अधिकार व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमातून विविध शासकीय सेवांची माहिती व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.
उल्हासनगर-३ येथील गोपाल समाज मंदिर, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी येथे विशेष शिबिर घेण्यात आले. या वेळी भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेतला. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी देण्यात आल्या.
शिबिरात जन्म प्रमाणपत्र, अधिवास व रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार नोंदणी व दुरुस्ती आदी सेवांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना, आयुष्मान भारत कार्ड, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, रेशन कार्ड, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्राबाबतही माहिती देण्यात आली.
शिबिरास आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी नगरसेविका शुभांगी मनोहर बहेनवाल, मनोहर बहेनवाल, दीपक पांडे, मंडळ ३-अचे उपाध्यक्ष गौरव पाठारे, सचिव संतोष चौधरी, गोपाल समाजाचे अध्यक्ष दीपक मोतीराम उज्जेनकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.