

पालघर, ता. ६ (बातमीदार) : महिलांनी केवळ बचत गटांपुरते मर्यादित न राहता उत्पादन, बाजारपेठ आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे जोडणी करण्याचा संदेश देत सेवा संकल्प अभियानांतर्गत डहाणूत राणी दुर्गावती महिला सशक्तीकरण मेळावा उत्साहात पार पडला.
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या वतीने के. एल. पौंदा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास डहाणू व तलासरी परिसरातील आदिवासी महिला, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सशक्तीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत या वेळी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि बचत गटांना व्यवसायाचे सक्षम माध्यम बनवावे, यावर मेळाव्यात विशेष भर देण्यात आला.
मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री. चिकू उत्पादने, घरगुती स्नॅक्स यांसह विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.