अनधिकृत रिक्षा थांब्यांनी कोंडी

अनधिकृत रिक्षा थांब्यांनी कोंडी
Published on: 

अनधिकृत रिक्षा थांब्यांनी कोंडी
कोपरखैरणे, ता. ६ (बातमीदार) : वाशी-कोपरखैरणे परिसरातील विविध भागांत अधिकृत रिक्षा थांब्यांव्यतिरिक्त रस्त्यांवरच रिक्षांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करून प्रवासी घेण्याची स्पर्धा सुरू असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाशी व कोपरखैरणे परिसरात बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच फेरीवाल्यांची वाढती संख्या आणि रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे उपलब्ध जागेवर ताण वाढला आहे. अधिकृत रिक्षा थांब्यांवर जागा अपुरी पडत असल्याने अनेक रिक्षाचालक प्रवासी मिळविण्यासाठी मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि अंतर्गत गल्ल्यांचा आधार घेत आहेत.
एकापाठोपाठ रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याने अरुंद मार्गांवरून इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होते. गर्दीच्या वेळेत यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. काही ठिकाणी पदपथालगत रिक्षा उभ्या राहत असल्याने पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.
वाशीतील सेक्टर नऊ मिनी मार्केट, सेक्टर १० मधील हॉटेल संजोग-शबरी परिसर, किसान कनेक्ट ते फोर्टिस हॉस्पिटल मार्ग, जुहूगावातील शिवसेना शाखा-विनम्र हॉस्पिटल मार्ग तसेच कोपरखैरणेतील डी-मार्ट चौक आणि जिमी टॉवरसमोरील रस्ता येथे रिक्षांच्या रांगा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अधिकृत रिक्षा थांबे असतानाही त्याबाहेर निर्माण होणाऱ्या अनधिकृत थांब्यांवर वाहतूक विभाग व संबंधित प्रशासनाने कारवाई करावी. रिक्षांसाठी निश्चित केलेल्या जागांचा आढावा घेऊन वाहतुकीला अ रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे पदपथ व्यापले जात असल्यानेडथळा ठरणारे अनधिकृत थांबे हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट
वाहतुकीला अडथळा
मुख्य रस्ते व बाजारपेठांमध्ये रिक्षांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालकांची कोंडी.

पादचारीही त्रस्त
रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे पदपथ व्यापले जात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ.

कारवाईची मागणी
अधिकृत स्थानकांबाहेरील अनधिकृत रिक्षा थांबे हटविण्याची नागरिकांची मागणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com