

पूर्णेकर हत्येचा तपास सूत्रधारांपर्यंत पोहोचवा
जयंत पाटील यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेने शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हत्येमागे प्रत्यक्ष आरोपींचा तपास न करता संपूर्ण कटाचा छडा लावून मुख्य सूत्रधारांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी केली.
पाटील यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत घटनेची माहिती घेतली. विकासकामांमध्ये पूर्णेकरांनी घेतलेल्या भूमिकेतून काही वाद निर्माण झाले होते. त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ठाणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहर आहे. त्याच शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत राजकीय कार्यकर्त्याची हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या अशा घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पूर्णेकर यांच्या हत्येचे नियोजन कोणी केले, त्यासाठी कोणाकडून मदत मिळाली आणि या कटामागे नेमके कोण आहेत, याचा शोध लागणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवून हत्येच्या मुळापर्यंत पोलिसांनी पोहोचले पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.