ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार, थार जीप थेट घरात!

ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार, थार जीप थेट घरात!
Published on: 

वज्रेश्वरीत ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार
दोन दुचाकींचे नुकसान; घरमालक जखमी, चालकासह दोघे ताब्यात

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : दारूच्या नशेत भरधाव थार जीप चालविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप घरासमोरील पत्र्याच्या शेडला धडकल्याची घटना मंगळवारी (ता. ६) घडली. या अपघातात शेडसह दोन दुचाकींचे नुकसान झाले असून, घराची भिंत व खिडकीही तुटली. भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने घरमालक सुभाष जयराम सुतार (५९) यांच्या डोके तसेच डाव्या हाताला दुखापत झाली.

सुभाष सुतार जांभूळपाडा, भाताणे येथे पत्नी व मुलासह राहतात. रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुतार कुटुंबीय घरातील हॉलमध्ये बसले होते. त्याच वेळी भाताणेकडून भालीवलीच्या दिशेने जाणारी थार जीप भरधाव आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घुसली. जीपने शेड तोडून तेथे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील चालक व त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोघांनाही दुखापत झाली होती. नागरिकांनी त्यांना मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले. चालक अंकित रविशंकर मिश्रा (२६), राज इंद्रजीत यादव (२४) नालासोपारा पूर्व येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. याप्रकरणी सुभाष सुतार यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com