पूर्णेकर हत्येतील दोन मारेकरी अद्याप मोकाट; टल्लीविरोधात ''एलओसी'' जारी

पूर्णेकर हत्येतील दोन मारेकरी अद्याप मोकाट; टल्लीविरोधात ''एलओसी'' जारी
Published on: 

दोन मारेकरी अद्याप मोकाट
पूर्णेकर हत्येतील टल्लीविरोधात एलओसी जारी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येला आठ दिवस उलटूनही संशयित संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि त्याचा हेल्मेटधारी साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. टल्ली परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पोलिसांची काही पथके महाराष्ट्रासह अन्य राज्यांत त्यांचा शोध घेत असून, एक पथक भारत-नेपाळ सीमेवर तैनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पूर्णेकर हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने पप्प्या शिंदे याला ठाण्यातून, तर निखिल यादव आणि नितेश पवार यांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून अटक केली आहे. या तिघांची चौकशी सुरू असून, पप्प्या शिंदेला येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ९) पुन्हा पोलिस कोठडी मिळाली आहे. तर यादव आणि पवार या दोघांची पोलिस कोठडी गुरुवारी (ता. ८) संपणार असून, त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
-----------
हत्येतील पिस्तूल जप्त
हत्येसाठी वापरलेले पिस्तूल पोलिसांनी कर्नाळा अभयारण्य परिसरातून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पिस्तूल नितेश पवार याने वापरल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच निखिल यादव याचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या पिस्तूल आणि मोबाईलच्या तपासातून हत्येच्या कटातील आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com