जोगेश्वरीत सेंद्रिय शेतमालाची थेट बाजारपेठ

जोगेश्वरीत सेंद्रिय शेतमालाची थेट बाजारपेठ
Published on: 

जोगेश्वरीत सेंद्रिय शेतमालाची थेट बाजारपेठ
दर मंगळवारी आठवडा बाजार; शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांच्या ताटात
जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : वाढती महागाई आणि अन्नभेसळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ताजा व सेंद्रिय शेतमाल रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जोगेश्वरी पूर्वेतील श्यामनगर परिसरात सेंद्रिय भाजीपाला व धान्याची थेट बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. श्री मुक्ताई माता शेतकरी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला, पालेभाज्या, कांदे, बटाटे, विविध प्रकारचे धान्य आणि अन्य शेतमाल थेट ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मध्यस्थ टाळून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांना ताजा शेतमाल वाजवी दरात मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या आठवडा बाजाराचा शुभारंभ मंगळवारी (ता. ६) इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्यामनगर, जोगेश्वरी पूर्व येथे झाला. दर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा बाजार भरणार आहे, अशी माहिती प्रियांका आंबोळकर यांनी दिली.
उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी खासदार रवींद्र वायकर, मनीषा वायकर, रचनाताई सावंत, ज्ञानेश्वर सावंत, प्रियांका आंबोळकर, डॉ. राहुल कुमार महाले, प्राजक्ता राहुल कुमार महाले-वायकर, बाबू धामापूरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ
अन्नभेसळीच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय आणि सुरक्षित शेतमालाला प्रोत्साहन देण्याबरोबरच शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण करण्याचा प्रयत्न या बाजारपेठेतून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुंबईत थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com