

दाम्पत्याचे पालकत्वाचे स्वप्न साकार
यशोदा आयव्हीएफ सेंटरच्या उपचारातून २२ वर्षांची प्रतीक्षा संपली
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : मुंबईतील एका दाम्पत्याचे तब्बल २२ वर्षांनी आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यशोदा आयव्हीएफ सेंटरच्या डॉक्टरांचे योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि आधुनिक प्रजनन उपचारांमुळे त्यांच्या पालकत्वाचे स्वप्न साकार झाले.
या दाम्पत्याने पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे विविध उपचार घेतले. दरम्यान, अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांच्या मनात निराशा निर्माण झाली होती; तरीही पालकत्वाची इच्छा कायम असल्याने त्यांनी यशोदा रुग्णालयाशी संपर्क साधला. सुरुवातीला आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्यविषयक मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर दाम्पत्याच्या परिस्थितीनुसार योग्य उपचारपद्धती निश्चित करण्यात आली.
यशोदा आयव्हीएफचे प्रजनन उपचारतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब खडबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर दाम्पत्याला आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन तसेच समुपदेशन देण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पालकत्नाचे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये प्रत्येक दाम्पत्याची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपलब्ध उपचारपद्धतींची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. आधुनिक प्रजनन उपचारांमुळे पालकत्वाची इच्छा असलेल्या अनेक दाम्पत्यांना विविध उपचार पर्याय उपलब्ध होत आहेत.
आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण
इतकी वर्षे आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. अनेकदा आशा निर्माण झाली आणि त्यानंतर निराशाही आली. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर पुन्हा विश्वासाने उपचार सुरू केले. आज आमचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, अशी भावना दाम्पत्याने व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.