नव्याने बांधलेली लिफ्ट सहा महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर

नव्याने बांधलेली लिफ्ट सहा महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर
Published on: 

व्यापारी संकुलातील लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद
नवीन पनवेल, ता. ७ (बातमीदार) ः आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाशेजारी असलेल्या पनवेल पालिकेच्या व्यापारी संकुलातील नव्याने उभारलेली लिफ्ट (उद्‌वाहन यंत्र) मागील सहा महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. पालिकेकडून कंत्राटदाराचे बिल थकीत राहिल्यामुळे ही लिफ्ट धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावर पालिकेची काही कार्यालये सुरू असून, कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांसाठी याठिकाणी लिफ्ट बसविण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने लिफ्टचे काम करण्यात आले, मात्र ठेकेदाराचे बिल पालिकेकडून थांबवल्यामुळे सहा महिने उलटूनही लिफ्ट सुरू करण्यात आली नाही. यामुळे ज्येष्ठ, महिला आणि नागरिकांना जिन्यावरून पायपीट करावी लागत आहे. करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलेली ही सुविधा प्रशासकीय दिरंगाईमुळे बंद पडून असल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या इमारतीमध्ये बसविलेली लिफ्ट ही पेणमधील सिल्लर कंपनीमार्फत बसविण्यात आली आहे. या कंपनीचे अखेरचे पैसे पालिकेने नुकतेच अदा केले असून, एक महिन्याच्या आत लिफ्ट नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येईल.
- राजेश कर्डिले, शहर अभियंता, पनवेल महापालिका

पनवेल महापालिका आमच्या खिशातून कराच्या माध्यमातून पैसे जमा करते, मात्र जेव्हा आमच्या गरजा पूर्ण करण्याची, तसेच आम्हाला सोयीसुविधा देण्याची वेळ येते तेव्हा चालढकल करताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे, मात्र सहा महिने झाले तरी त्या लिफ्टच्या दिशेने बघून आम्हाला फक्त पायऱ्याच चढाव्या लागत आहेत.
- मनोजसिंह परदेशी, जागरूक नागरिक, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com