४० कोटींच्या गटार झाकणांचा हिशेब द्या

४० कोटींच्या गटार झाकणांचा हिशेब द्या
Published on: 

४० कोटींचा हिशेब कुठे?
गटार झाकणांच्या प्रस्तावावरून महासभेत गदारोळ
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पनवेल पालिका क्षेत्रातील रस्त्यालगतच्या गटार आणि पादचारी मार्गांवरील इन्स्पेक्शन चेंबर्सच्या झाकणांच्या कामावरून सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. यापूर्वी झालेल्या कामासाठी खर्च झालेल्या सुमारे ४० कोटी रुपयांचा सविस्तर हिशेब आणि कामाचा तपशील उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव ठाकरे गटनेत्या लीना गरड यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला.
महापालिका प्रशासनाने २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांसाठी गटार व पादचारी मार्गांवरील इन्स्पेक्शन चेंबर्सना आवश्यकतेनुसार झाकणे बसविणे आणि किरकोळ दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. मात्र, मागील कामाचा हिशेब स्पष्ट नसताना नव्याने सुमारे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला.
अरविंद म्हात्रे यांनी यापूर्वी खर्च झालेल्या ४० कोटी रुपयांत किती झाकणे बसविण्यात आली, ती कुठे बसविण्यात आली, कोणत्या दराने काम झाले तसेच संबंधित बिले आणि कामाचा तपशील सभागृहात सादर करण्याची मागणी केली. ४० कोटींचा हिशेब न देता पुन्हा आठ कोटींचा प्रस्ताव कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कामात अनियमितता झाल्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वेळी लीना गरड यांनी म्हात्रेंना पाठिंबा देत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोप केला.
दरम्यान, या अनियमिततेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती अरविंद म्हात्रे यांनी बोलताना दिली. या आरोपांबाबत महापालिका प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण मात्र मिळू शकले नाही.
कोट
विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सभात्याग करून केवळ प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटगिरी आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने काम करून सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत, केवळ राजकीय दिखावा करू नये.
- नितीन पाटील,
महापौर पनवेल महापालिका

फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com