

वांद्रे येथे युवक काँग्रेसचा रास्ता रोको
राहुल गांधींना ताब्यात घेतल्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षातील नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे रिक्लेमेशन येथे मंगळवारी रात्री रास्ता रोको आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रात्री ११ वाजता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे रिक्लेमेशन येथे रास्ता रोको करीत वाहतूक रोखली. या वेळी मोदी सरकार तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसने निषेध नोंदवला. या आंदोलनाला मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस तेजस चंदूरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रज्ञा ढवळे, अजय मिश्रा, शादाब अन्सारी, शिवा यादव, अब्दुल समद, पंकज चौधरी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या, की राहुल गांधी हे खासदारांसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना भेटायला जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, ही मोदी सरकारची दडपशाही आहे. आम्ही या दडपशाहीचा निषेध करतो. मोदी सरकार जेव्हा जेव्हा राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, त्या प्रत्येकवेळी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असे शबरीन म्हणाल्या.
दरम्यान, आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी महिला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की व मारहाण केली तसेच काही महिला कार्यकर्त्यांना केसाला धरून ओढत पोलिस व्हॅनमध्ये फेकले, असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा मुंबई युवक काँग्रेसने निषेध केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.