श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठा विस्कळित

श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठा विस्कळित
Published on: 

श्रीवर्धनमध्ये वीजपुरवठा विस्कळित
पर्यटकांच्या गर्दीत हॉटेल व्यावसायिकांची गैरसोय
श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) : श्रीवर्धन येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ऑक्टोबरच्या उकाड्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, पर्यटन व्यवसायालाही त्याचा फटका बसत आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी असताना होमस्टे, हॉटेल आणि रिसॉर्टमधील सेवा विस्कळित झाल्याने पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वीजपुरवठ्यावर वातानुकूलित यंत्रणा, पाणीपुरवठा, स्वयंपाकघर, ऑनलाइन बुकिंग यांसह विविध सेवा अवलंबून आहेत. त्यामुळे हॉटेल-रिसॉर्ट चालकांचे कामकाज प्रभावित झाले आहे. दुकाने, लघुउद्योग आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांनाही आर्थिक फटका बसत असल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

पाच रोहित्रांची उभारणी सुरू
महावितरण कार्यालयाच्या माहितीनुसार, पर्यटकांची संख्या वाढल्याने विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, काही ठिकाणी विद्युत यंत्रणेवरील भार वाढला आहे. त्यामुळे तीन अतिरिक्त रोहित्रांना मंजुरी देण्यात आली असून, आणखी दोन रोहित्रांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण पाच नवीन रोहित्रांच्या उभारणीचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. उपकार्यकारी अभियंता शाम मोरे यांनी सांगितले की, नवीन रोहित्रांमुळे यंत्रणेवरील भार कमी होऊन पुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होईल. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com