श्रीवर्धनमध्ये श्वानांवर कारवाई

श्रीवर्धनमध्ये श्वानांवर कारवाई
Published on: 

श्रीवर्धनमध्ये श्वानांवर कारवाई
निर्बीजीकरणासह लसीकरण मोहीम वेगात
श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन श्रीवर्धन नगर परिषदेने विशेष मोहीम सुरू केली आहे. १० सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७७ श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरातील विविध भागांत भटक्या श्वानांची संख्या वाढली होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पथके आणि विशेष वाहने तैनात करण्यात आली आहेत. पकडलेल्या श्वानांना रानवली येथील विशेष केंद्रात नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण करण्यात येते. त्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस देऊन आवश्यक उपचार व देखभाल केली जाते. उपचार पूर्ण झाल्यानंतर श्वानांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्यात येत आहे.

सुरक्षिततेसाठी सातत्याची गरज
नगर परिषदेच्या मोहिमेमुळे श्वानदंशाच्या भीतीखाली असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मोहीम सातत्याने राबवून भटक्या श्वानांच्या संख्येवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. उपनगराध्यक्ष तथा सभापती अनंत गुरव यांनी, या मोहिमेमुळे लवकरच शहरातील भटक्या श्वानांची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येऊन नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

चौकट :
मोहीम सुरू : १० सप्टेंबरपासून
निर्बीजीकरण : १७७ श्वानांवर
रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरू
रानवली येथे विशेष उपचार केंद्र
प्रशिक्षित पथकांकडून पकडण्याची कार्यवाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com