भिरा-विले मार्गावर खड्डे

भिरा-विले मार्गावर खड्डे
Published on: 

भिरा-विले मार्गावर खड्डे
रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकीस्वार त्रस्त
रोहा, ता. ७ (बातमीदार) : कोलाडमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या भिरा फाटा ते विले भागाड एमआयडीसी या १८ किलोमीटरच्या प्रमुख मार्गाची अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. लोखंडी कॉइल्स वाहून नेणाऱ्या ट्रेलरची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कार्यवाही केलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
या मार्गावरून पर्यटन, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होते. गणेशोत्सवानंतर हेटवणे गावासह अन्य ठिकाणी रस्त्याच्या कडेला ठेवलेली बारीक खडी वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दुचाकी आणि रिक्षाचालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. परिसरात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्री खडी न दिसल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत आहेत.

दिवाळीपूर्वी दुरुस्तीची मागणी
पुढील महिन्यात दिवाळी सण असल्याने त्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रवाशांचा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भिरा फाटा ते विले भागाड एमआयडीसीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघात होत असल्याचे हरिश्चंद्र महाडिक यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com