

पोषण आहाराबाबत जनजागृती
अलिबाग नगर परिषदेचा उपक्रम; सकस आहाराचे महत्त्व अधोरेखित
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : राष्ट्रीय पोषण महाअभियान २०२६ अंतर्गत अलिबाग नगर परिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. ६) उर्दू शाळेत पोषण आहार कार्यक्रम उत्साहात पार पडला. अंगणवाडी सेविका, कर्मचारी आणि लाभार्थी यांच्या सहभागातून पोषणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी जंक फूडच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सकस आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. सुदृढ पिढी घडवायची असल्यास त्याची सुरुवात बालपणापासून झाली पाहिजे. मुलांना संतुलित व पौष्टिक आहार मिळणे ही कुटुंबासह संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. मातांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून, पोषण ही सक्षम समाजाची पायाभरणी असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे यांनी सुदृढ बालक हा देशाचा पाया असल्याचे सांगितले. कार्यक्रमातील पथनाट्यातून पोषणाबाबत प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे सुदृढ समाज आणि राष्ट्रनिर्मितीस मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी नगरसेविका नीलम हजारे, अश्विनी ठोसर, निवेदिता वाघमारे, योजना पाटील, अनिल चोपडा, संतोष गुरव, जमाल सय्यद, ऋतुजा फुटाणे, प्रशासकीय अधिकारी श्रद्धा नवले, अंगणवाडी सुपरवायझर सोनाली धुमाळ यांच्यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष
बालकांना नियमितपणे सकस, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा, यासाठी कुटुंब आणि समाजाने जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि बालपणापासून योग्य आहाराची सवय लावणे आवश्यक असल्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.