

पूर्णेकर हत्याकांड
़़़़़़़़़़़
मारेकऱ्यांनी वापरलेली कार जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी पळण्यासाठी वापरलेली कार अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. पनवेल-कळंबोली परिसरातील एमजीएम रुग्णालयाजवळ ही कार पोलिसांनी जप्त केली. ही कार अटकेतील पप्प्या शिंदे याचा मित्र विजय पवार याची असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत पप्प्याने ती वापरण्यासाठी घेतल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
हत्येच्या चार दिवस आधीच कारमध्ये दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरून ती समतानगर परिसरात उभी करण्यात आली होती. हत्येनंतर मारेकरी दुचाकीवरून समतानगर येथे गेले. तेथून कार घेऊन त्यांनी पनवेलच्या दिशेने पलायन केले. कळंबोलीतील एमजीएम रुग्णालय परिसरात पेट्रोल संपल्याने कार रस्त्यावरच सोडून मारेकरी पसार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्णेकर यांच्या हत्येला आठ दिवस झाले आहेत. तपासात आतापर्यंत पप्प्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक झाली आहे. तीन दुचाकी, पिस्टल आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, ही कार तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, निखिल यादव आणि नितेश पवार यांची पोलिस कोठडी गुरुवारी (ता. ८) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. हत्येत वापरलेले पिस्टल जप्त झाल्याने पुढील तपासासाठी दोघांच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.