

सिडकोविरूद्ध बोकडविरावासीयांचे काम बंद आंदोलन
उरण, ता. ७ (वार्ताहर) ः सिडकोबाधित भूमिपुत्रांचे वाढीव गावठाण, साडेबारा टक्के विकसित भूखंड, वाढीव मोबदला आणि पुनर्वसनाचे महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. असे असतानाच, सिडको प्रशासनाने बोकडविरा गावाच्या हद्दीत जबरदस्तीने मातीचा भराव करण्यास सुरुवात केल्याने स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याविरोधात गुरुवारी (ता. ८) काम बंद पाडून धरणे आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील हेदेखील या आंदोलनात थेट सहभागी होणार आहेत.
ग्रामस्थांनी यासाठी सिडको आणि पोलिसांना विनंती करून प्रथम प्रलंबित मागण्यांचा विचार करुन चर्चा करावी. त्यानंतर भराव करावा, अशी मागणी केली. या संदर्भात सिडको अधिकारी, पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात संयुक्त बैठक देखील गणेश मंदिरात घेण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी सिडकोने भरावाचे काम प्रथम बंद करून ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र, ही चर्चा अनिर्णित राहिल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
या कामासाठी असलेली मंजुरी, नकाशा, आदेश व परवानग्या ग्रामस्थांना दाखविण्यात याव्यात. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने लेखी खात्री द्यावी. ग्रामस्थांच्या हरकती व आक्षेपांची अधिकृत नोंद घेण्यात यावी. ग्रामस्थांशी चर्चा करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.