

वाचनातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरारी
सकाळ एनआयई उपक्रमातून वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन
पेण, ता. ७ (वार्ताहर) : सकाळ समूहाच्या एनआयई उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील वरसई आदिवासी आश्रमशाळेत सकाळ एनआयईच्या वतीने वाचन संस्कृती विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम बुधवारी (ता. ३०) पार पडला. या वेळी तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. सकाळच्या अंकातून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त विविध माहिती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापक एस. व्ही. वणवे, अधीक्षक के. जे. वारे, अधीक्षिका जे. एस. वाघाडे, व्ही. डी. पाटील, व्ही. टी. साळुंखे, डी. व्ही. खरात, एम. के. पाडवी, आर. डी. कोकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना एनआयईच्या शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी इतर उपक्रमांमध्येही सहभागी होणे गरजेचे आहे. एनआयई उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय आणि ज्ञानाची भूक वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी नियमितपणे सकाळचे वाचन केल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच हातभार लागेल, असे मुख्याध्यापक एस. व्ही. वणवे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.