‘सकाळ करंडक’च्या निमित्ताने रंगणार ज्येष्ठ कलावंतांशी संवाद

‘सकाळ करंडक’च्या निमित्ताने रंगणार ज्येष्ठ कलावंतांशी संवाद
Published on: 

‘सकाळ करंडक’निमित्त ज्येष्ठ कलावंतांशी संवाद
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत आज तरुणाईचे नाट्याविष्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत उद्या (ता. ८) तरुणाई त्यांचे नाट्याविष्कार सादर करणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुविख्यात अभिनेत्री मधुराणी गोखले सायंकाळी ५.३० वाजता संवाद साधणार आहेत. सकाळी ९ वाजतापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, नाट्यरसिकांना प्रवेश नि:शुल्क आहे.
मुंबई विभागीय अंतिम फेरीत एकूण आठ एकांकिका सादर होणार आहेत. त्यातून सर्वोत्कृष्ट पहिल्या क्रमांकाची एकांकिका पुणे येथे हाणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवडली जाईल, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी त्यांची मुलाखत नाट्यरसिक आणि विद्यार्थी कलावंतांसाठी विशेष आकर्षण असेल.

मुंबईत सादर होणाऱ्या एकांकिका
सकाळी ९ वा. : सिडेनहॅम महाविद्यालय : यात्रा
सकाळी १० वा. : सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज : खोटं बोल नाऱ्या
सकाळी ११ वा. : आर. ए. पोद्दार कॉलेज : मालिक
सकाळी १२ वा. : डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय : जिलेबी
दुपारी १.३० वा. : चेतना कॉलेज : मॅरेथॉन
दुपारी २.३० वा. : विद्यालंकार कॉलेज : शुभमंगल सावधान
दुपारी ३.३० वा. : कीर्ती कॉलेज : हर हर गंगे
दुपारी ४.३० वा. : महात्मा फुले महाविद्यालय : अर्जुनाचं झाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com