परभणीत होणार बुद्ध धम्माच्या वैश्विक विचारांचा जागर

परभणीत होणार बुद्ध धम्माच्या वैश्विक विचारांचा जागर
Published on: 

परभणीत बौद्ध धम्माच्या वैश्विक विचारांचा जागर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : बौद्ध धम्म परंपरेत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावास पर्वानिमित्त परभणीतील उमरी-मांडाखळी येथे बौद्ध धम्माच्या वैश्विक विचारांचा जागर होणार आहे. परभणीतील नियोजित बुद्ध विहाराच्या १० एकर जागेत रविवारी (ता. १८) परित्राण पाठ, चीवरदान, धम्मदेशना आणि बुद्धमूर्ती वाटपाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात थायलंडच्या भिक्खू संघासह देश-विदेशांतील विद्वान भिक्खू उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली.

थायलंड येथील भिक्खू संघाच्या वतीने पवित्र परित्राण पाठाचे पठण करण्यात येणार असून, त्यानंतर धम्मदेशना होणार आहे. आश्रय सेवाभावी संस्था आणि गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षावासाच्या काळात भिक्खू संघातर्फे एका ठिकाणी राहून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा सखोल अभ्यास, चिंतन व साधना करण्यात येते. धम्मपरंपरेला पुढे नेत उमरी-मांडाखळी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच चीवरदान आणि बुद्धमूर्ती वाटप या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी थायलंड येथील भदन्त साँगसाक कोविडा, भदन्त थेरायुत चट्टामालो यांच्यासह अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भदन्त अभिवन्नो यांच्यासह भिक्खूंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक, थायलंडच्या उद्योगपती मैथाई तसेच त्रिरत्न भूमी सोसायटी, थायलंडचे संस्थापक कॅप्टन डॉ. नट्टकटी उपस्थित राहणार आहेत.
..
धम्मपरंपरेला पुढे नेण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, देश-विदेशातील भिक्खू उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी आवर्जून उपस्थितीत राहावे.
- डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com