रामशेठ ठाकूर यांना ‘ जीवन गौरव’ पुरस्कार

रामशेठ ठाकूर यांना ‘ जीवन गौरव’ पुरस्कार
Published on: 

रामशेठ ठाकूर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान
पनवे, ता. ७ (बातमीदार) ः शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने आयोजित ‘शरदरत्न पुरस्कार सोहळ्या’त लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात सातत्याने कार्यरत राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गाैरव करण्यात आला.
हा सन्मान मुंबई येथे बुधवारी (ता. ७) करण्यात आला. रामशेठ ठाकूर यांनी समाजसेवेचा ध्यास घेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्राविषयीची त्यांची बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रमांना दिलेल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे त्यांच्या कार्याला समाजात वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात कार्यरत राहून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानातून अनेक उपक्रमांना बळ मिळाले असून, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव करणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार हा निश्चितच अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या सन्मानामुळे रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळण्यासोबतच समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांसाठी हा गौरव प्रेरणादायी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com